एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे आधीच फिक्स होतं?; एकनाथ शिंदेंनी सत्तांतराच्या काळातील परिस्थिती सांगितली…
सत्तांतरावेळी नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंच्या मनात काय सुरु होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले? पाहा...
मुंबई : मागच्या वर्षी राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आणि महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. या सत्तांतरावेळी एकनाथ शिंदे यांच्या मनात काय चाललेलं? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे आधीच फिक्स होतं का? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. त्याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात दिलं. “मुख्यमंत्री होणार की नाही, हे पण मला माहित नव्हतं. फक्त आमदारांची रखडणारी कामं आणि जनतेचे प्रश्न डोळ्यासमोर होते”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. माझ्या डोळ्यासमोर केवळ लोकांचा विकास, त्यांचे प्रश्नच असतात, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
Published on: Feb 13, 2023 11:50 AM