मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला, मृत्यूही घटले
मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला, मृत्यूही घटले
मुंबई: काही दिवसांपूर्वीच राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थिती वेगाने सुधारत आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट पीक पॉईंटला असताना मुंबईत दिवसाला 11 हजारापर्यंत रुग्ण सापडत होते. मात्र, आता शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे.