Ulhasnagar मध्ये खिळे असलेल्या दांडक्याने मारहाण, तरुण गंभीर जखमी

| Updated on: Mar 21, 2022 | 11:25 AM

मालकाला चुगली केल्याच्या संशयातून एका तरुणाने त्याच्याच जुन्या सहकाऱ्याला खिळे असलेल्या दांडक्याने मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडलीये. या घटनेत मारहाण करण्यात आलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आलंय.

उल्हासनगरच्या (Ulhasnagar)कॅम्प 5 मधील दुधनाका परिसरात वासुशेठ यांचा तबेला आहे. मालकाला चुगली केल्याच्या संशयातून एका तरुणाने त्याच्याच जुन्या सहकाऱ्याला खिळे असलेल्या दांडक्याने मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडलीये. या घटनेत मारहाण करण्यात आलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आलंय. या तबेल्यात पप्पू भारती आणि धर्मेंद्र (Dharmendra) दोघे एकत्र काम करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी मालकाने धर्मेंद्र याला कामावरून काढून टाकलं. यानंतर पप्पू याने मालकाकडे आपल्याबाबत चुगली केल्यानेच मालकाने आपल्याला कामावरून काढून टाकल्याचा संशय धर्मेंद्र याला होता. त्यातच शनिवारी (Saturday) 19 मार्च रोजी रात्री पप्पू हा तबेल्यात झोपलेला असताना धर्मेंद्र हा त्याला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने तिथे आला. त्यानं खिळे असलेल्या दांडक्याने पप्पू याच्या उजव्या डोळ्यावर, डोळ्याच्या बाजूला, उजव्या कानाच्या मागे, डोक्यावर आणि गालावर मारहाण केली. झोपेत असताना ही मारहाण झाल्यानं काही कळायच्या आतच पप्पू याला गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या

Published on: Mar 21, 2022 11:25 AM
Video : शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी घेतली गिरीश महाजनांची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
ऑस्ट्रेलियातून परत आणलेल्या पुरातन वस्तूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाहणी