मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध 22 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.