किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा; मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश
किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्याविरोधात 'एसआरए' प्रकरणी वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता
मुंबई : मुंबईच्या माजी महापौर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कथित एसआरए घोटाळ्या प्रकरणी पुढील निर्देशापर्यंत पेडणेकर यांच्यावर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहे. त्यामुळे 11 जूनपर्यंत किशोरी पेडणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबांतील सदस्याविरोधात ‘एसआरए’ प्रकरणी वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. पेडणेकर यांच्यावर फसवणूक प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात पेडणेकर यांनी दाव घेत याचिका दाखल केली होती.
Published on: Apr 21, 2023 07:15 AM