मुंबई-गोवा महामार्गासाठी बाप्पा मदत करणार

| Updated on: Aug 26, 2022 | 1:15 PM

महामार्गाबरोबरच त्यांनी कशेडी घाटाचीही पाहणी करणार असल्याचे सांगत लवकरच हा मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

गणेश चतुर्थी तोंडावर आली असल्याने मुंबईतील चाकरमाने आता आपल्या गावी रवाना होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई-गोवा महामार्ग खराब झाल्याने आणि रस्त्यात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, गोवा मुंबई महामार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करु आणि गोवा मुंबई महामार्ग चांगल्या होण्यासाठी आता आपल्याला गणपती बाप्पाही मदत करील अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या महामार्गाबरोबरच त्यांनी कशेडी घाटाचीही पाहणी करणार असल्याचे सांगत लवकरच हा मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Aug 26, 2022 01:15 PM
Pune Pashan Talav | पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना नो एन्ट्री – tv9
आदिवासी अधिकाऱ्याच्या घरातील पैसे मोजण्यासाठी मशिन मागवली…