ईडीच्या कारवाई आणि महाराष्ट्र-कर्नाटक हा सीमप्रश्नावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

| Updated on: Mar 16, 2023 | 12:39 PM

Hasan Mushrif on ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची गेल्या काही दिवसांपासून ईडी चौकशी सुरू आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना मुश्रीफ यांनी या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी सुरू आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना मुश्रीफ यांनी या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची कारवाई जरी सुरू असली तरी देखील मी आज मुंबईत आलेलो आहे आणि याविषयी मी फार काही बोलणार नाही, असं मुश्रीफ म्हणालेत. “महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमाप्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने तिथल्या 800 गावाना सर्व निधी दिला आहे. शाळकरी मुलांनाही निधी दिला आहे. ज्यांना जिथे राहायचे आहे राहू द्या. त्यांना कुठल्या सेवा घ्यायच्या आहेत. त्या घेऊ द्या. तो त्यांचा सांविधानिक अधिकार आहे, असंही मुश्रीफ म्हणालेत.

Published on: Mar 16, 2023 12:39 PM
मुश्रीफा यांच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याला एसीबीची नोटीस
अवकाळीचा फटका, शेतकरी हवालदिल; संत्र्याचे दर कोसळले