ST कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यत कामावर रुजू व्हावं, हायकोर्टाचे आदेश
एसटी कर्मचाऱ्यांना (msrtc) येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने (court) दिले आहेत. मात्र, हे आदेश देतानाच कोर्टाने राज्य सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत.
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना (msrtc) येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने (court) दिले आहेत. मात्र, हे आदेश देतानाच कोर्टाने राज्य सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ आणि निवृत्ती वेतन देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आम्ही अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे आता कामगारांनी किंतु, परंतु करू नये. संप करू नये असं राज्य सरकारने कोर्टात सांगितलं. त्याला आम्ही जोरदार आक्षेप घेतला. आम्ही संप करणार नाही. पण एकही आत्महत्या होणार नाही. एकही विधवा होणार नाही याची जबाबदारी घेण्यास सरकारला सांगा, असं आम्ही कोर्टाला सांगितलं, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांनी सांगितलं.