Jaykumar Gore यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

Jaykumar Gore यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

| Updated on: Jun 15, 2022 | 12:21 AM

मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली अटक  टाळण्यासाठी गोरे यांनी सुरूवातीला वडुज सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जयकुमार गोरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यावर अटकेची लटकती तलवार कायम आहे. मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली अटक  टाळण्यासाठी गोरे यांनी सुरूवातीला वडुज सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Published on: Jun 15, 2022 12:21 AM
Special Report | जगतापांची ‘भाई’गिरी की लाड यांना ‘प्रसाद’?
Amol Mitkari | ‘राष्ट्रवादी योग्यवेळी उत्तर देईल,भाजपची पळता भुई थोडी होईल’