दर्शन सोलंकी प्रकरणाला नवे वळण; पोलिसांनी छळ केला, दर्शन सोळंखीच्या वडिलांचा आरोप

| Updated on: Mar 30, 2023 | 7:15 AM

दर्शन सोळंकीच्या वडिलांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे

मुंबई : मुंबई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने आत्महत्या केली. त्या प्रकरणाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. तर एफआयआर दाखल करताना पोलिसांनी छळ केल्याचा आरोप दर्शन सोळंखीच्या वडिलांनी केला आहे. दर्शन सोळंखीच्या वडिलांनी तपास करणाऱ्या पोलिसांवरच आरोप केल्याने प्रकरण तापण्याची शक्यता आहे. दर्शन सोळंकीच्या वडिलांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. दर्शन सोळंकी या विद्यार्थ्यांने 12 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.

Published on: Mar 30, 2023 07:14 AM
गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावलं; एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली
राजकारणातील एक अनमोल रत्न म्हणजे आमचे गिरीशभाऊ; आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीस गहिवरले