मुंबईकरांची प्रतिक्षा संपली; पाच वर्षानंतर लोअर परेल पूल वाहतुकीसाठी खुला होणार

| Updated on: Feb 08, 2023 | 8:06 AM

मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. पाच वर्षानंतर लोअर परेल पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पाहा...

मुंबई : मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. पाच वर्षानंतर लोअर परेल पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. लोअर परेल ईस्ट आणि लोअर परेल वेस्टला जोडणारा हा पूर मागच्या 5 वर्षांपासून बंद होता. मागची पार वर्षे दादर, प्रभादेवी भागातून करी रोडकडे जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना लालबागवरून यावं लागत होतं. वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागत होता. आता अखेर हा पूल लोकांच्या सेवेत रुजू होतोय. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे देर आये दुरुस्त आये!, असंच काहीसं मुंबईकर म्हणत आहेत.

Published on: Feb 08, 2023 08:05 AM
उमेदवार जोमात, अधिकारी कोमात, चिल्लर मोजता मोजता झाली दमछाक
आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, केला गेला की करवला गेला, विरोधी पक्षाचा आरोप काय ?