Mumbai येथील Mankhurd मधील परिस्थिती नियंत्रणात,मात्र तणावपूर्ण शांतता

| Updated on: Apr 11, 2022 | 10:32 AM

मुंबईतील मानखुर्द पोलीस स्टेशनच्या (Mankhurd) हद्दीत पीएमईजीपी कॉलनी परिसरात रविवारी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. रामनवमीच्या मिरवणुकीवेळी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी (Ruckus) झाली. यावेळी बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी 15 ते 20 गाड्यांची तोडफोड (Mumbai Crime) केल्याचं समोर आलं आहे.

मुंबईतील मानखुर्द पोलीस स्टेशनच्या (Mankhurd) हद्दीत पीएमईजीपी कॉलनी परिसरात रविवारी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. रामनवमीच्या मिरवणुकीवेळी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी (Ruckus) झाली. यावेळी बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी 15 ते 20 गाड्यांची तोडफोड (Mumbai Crime) केल्याचं समोर आलं आहे. ही घटना रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

काय आहे प्रकरण?
मुंबईतील मानखुर्द भागात पीएमईजीपी म्हाडा कॉलनी येथे काही अज्ञात व्यक्ती बाईकवर स्वार होऊन आले. त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या अनेक गाड्यांची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या घटनेबाबत मानखुर्द पोलीस अधिक तपास करत आहेत

Raj Thackeray साहेबांवर, पक्षावर माझी कुठली नाराजी नाही – Vasant More
‘BJPने Gunaratna Sadavarte सारख्या माकडाच्या हातात कोलीत देऊ नये’; सामनामधून Sanjay Raut यांची टीका