Girni Kamgar | गिरीणी कामगारांच्या घरासाठी लवकरच म्हाडाची सोडत – tv9
गिरीणी कामगारांसाठी खुश खबर असून आता लवकरच म्हाडाकडून कामगारांच्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. गिरीणी कामगारांच्या 2521 घरांसाठी ही सोडत निघणार आहे.
मुंबई महानगरात गिरीणी कामगार म्हणून राहणाऱ्या अनेक गिरीणी कामगारांच्या घराचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. गिरीणी कामगारांसाठी खुश खबर असून आता लवकरच म्हाडाकडून कामगारांच्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. गिरीणी कामगारांच्या 2521 घरांसाठी ही सोडत निघणार आहे. याच्या आधीच राज्य सरकारने 1 लाख 75 हजार कामगारांना घरे देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही प्रमाणात सोडतही काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर या प्रक्रियेचा वेग मंदावला होता. पण आता याला पुन्हा वेग येण्याची चिन्हं दिसत आहेत. तर गिरणी कामगारांसाठी लवकरच म्हाडा कडून सोडत काढण्यात येणार आहे.