महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे गटाला शिंदे यांचा दे धक्का? माजी नगरसेविकासह शाखाप्रमुखाला फोडलं

| Updated on: May 24, 2023 | 9:38 AM

मुंबईतील माजी नगरसेविका चंद्रावती मोरे आणि शाखाप्रमुख मनीष नायर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 121 च्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरे आणि शाखाप्रमुख मनीष नायर यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला.

मुंबई : मुंबई महापालिकाच्या निवडणुकांवरून सध्या जोरदार आपोर-प्रत्योर होत आहेत. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊनच राजकीय पक्ष त्यांची गणितं ठरवतं आहेत. त्यामुळे अनेकांचा पक्ष प्रवेश होताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाला मुंबई महापालिकाच्या निवडणुकांच्या आधिच धक्का बसला आहे. मुंबईतील माजी नगरसेविका चंद्रावती मोरे आणि शाखाप्रमुख मनीष नायर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 121 च्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरे आणि शाखाप्रमुख मनीष नायर यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना-शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती पाहून ते आपल्या प्रभागातील प्रलंबित विकासकामे नक्की पूर्ण करतील याची खात्री वाटल्यानेच आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चंद्रावती मोरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सर्व प्रलंबित कामे नक्की पूर्ण केली जातील, अशी ग्वाही या वेळी दिली.

Published on: May 24, 2023 09:38 AM
अजित पवार यांच्या ‘स्टॅम्प पेपर’ या वक्तव्यावरून भाजपची मविआवर टीका? आता फक्त ‘गीता’
Special Report| लोकसभा निवडणुकांची तयारी आत्तापासूनच का? पडद्यामागं काय घडतंय?