उबाटा थंड हवेच्या ठिकाणी अन् काँग्रेस, राष्ट्रवादी एसीमध्ये; त्यांना जनतेशी काहिही घेणदेण नाही; भाजप नेत्याचा टोला
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसवर टीका केली आहे. यावेळी शेलार यांनी, मुंबईच्या जनतेशी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उबाठाला काही काही घेणे देणे नाही
मुंबई : मुंबईच्या पाणीपट्टीत सहा ते सात टक्के वाढ होणार आहे. येत्या 16 जूनपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसवर टीका केली आहे. यावेळी शेलार यांनी, मुंबईच्या जनतेशी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उबाठाला काही काही घेणे देणे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ला फक्त एसी तर उबाठाला थंड हवेच्या ठिकाणी आवडत असा टोला लगावला आहे. तर उबाठा हा कधी नाल्यावर दिसली ना कधी मिठी नदीवर आणि ना कधी पंम्पींगस्टेशनवर. मुंबईकरांसाठी फक्त भाजपचं काम करत असल्याचंही ते म्हणाले.
Published on: Jun 05, 2023 01:44 PM