उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील; शिवसेनेच्या नेत्याचा दावा

| Updated on: Mar 27, 2023 | 8:41 AM

Uddhav Thackeray Malegoan Sabha : उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा झाली. त्यांच्याबरोबर गद्दार नव्हते का? वारंवार गद्दार म्हणायचे जे लोक दुसरा पक्ष सोडून गेलेले आहे ते गद्दार नाही का?, असा प्रश्न नरेश मस्के यांनी उपस्थित केलेला आहे. पाहा...

मुंबई : उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, असं शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे गटामध्ये जे काही लोक बोललेले आहेत. ते आमदार लवकरात शिंदे गटांमध्ये प्रवेश करतील, असाही दावा त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आज राहुल गांधी यांच्या विधानाचा विरोध केला आहे. काही दिवसांमध्येच ते महाविकास आघाडी तोडतील. अन् बाहेर पडतील, असंही म्हस्के म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरही त्यांनी टीका केलीय.  ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Published on: Mar 27, 2023 08:38 AM
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, त्यामुळे ते माझ्या नावाचा वारंवार उल्लेख करतात; भाजपच्या नेत्याचं प्रत्त्युत्तर
100 SuperFast News | मोदींच्या नावाने निवडणुकीला सामोर जा ठाकरेंच भाजपला आवाहान