टायगर अभी जिंदा है!; निलंबनाच्या कारवाईनंतर जयंत पाटील पहिल्यांदाच अधिवेशनात सहभागी होणार, कार्यकर्त्यांकडून टीझर रिलीज
राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. जयंत पाटील यांच्यावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर ते आज पहिल्यांदाच विधिमंडळात दाखल होतील.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर आता आज ते पहिल्यांदाच सभागृहात दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. पण कुटुंबात लग्न असल्यामुळे मागील दोन दिवस जयंत पाटील विधानभवनात हजर नव्हते. आता आज निलंबनाच्या कारवाईनंतर ते पहिल्यांदाच विधानभवनात दाखल होतील. त्याआधी जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विधानभवनातील विविध भाषणांचा एक टीझर तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.
Published on: Mar 01, 2023 08:23 AM