जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीचं काम करत राहणार- अजित पवार
भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर अजित पवार यांनी एका वाक्यात निकाल लावला. म्हणाले, माझ्या बाबतच्या चर्चा थांबवा. आता त्याचा तुकडा पाडा.
मुंबई : मागच्या काही दिवसापासून अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर त्यावर अजित पवार यांनी आज स्वत: या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीचं काम करत राहणार आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत. माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.आज मला काही आमदार भेटले. पण ते आमदार मला कामानिमित्त भेटण्यासाठी आलेत. कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवल्या जातोय, असं अजित पवार म्हणाले आहेत. माझ्या बाबतच्या चर्चा थांबवा. आता त्याचा तुकडा पाडा. शरद पवार यांनी स्वतः सांगितलं आहे की यामध्ये काहीही तथ्य नाही. त्यामुळे या चर्चा आता थांबल्या पाहिजेत. माझ्या भूमिकेवर दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी बोलू नये. शिंदे गटाच्या नेत्यांना तर बोलण्याचा अधिकारच नाहीये, असंही अजित पवार म्हणालेत.
Published on: Apr 18, 2023 03:33 PM