‘रामराज्य’ म्हणता आणि रावणासारखा कारभार करता; ठाकरे गटाच्या खासदाराचं शिवसेनेवर टीकास्त्र

| Updated on: Apr 09, 2023 | 3:48 PM

खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिवसेनेवर घणाघात केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? पाहा...

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर घणाघात केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे कुठलाच मुद्दा नाही. कारभार कसा करावा? रामराज्य असा शब्द वापरतात आणि रावणासारखा कारभार सुरू आहे. जनाची नाही तर मनाची लाज वाटावी, अश्या प्रकारचं काम करणाऱ्या लोकांनी प्रभू श्रीरामाचं नाव सुद्धा घेऊ नये, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. निवडणूक आयोग आणि भाजपच्या आशीर्वादाने चोरलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!, असा घणाघातही अरविंद सावंत यांनी केला आहे. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते.

Published on: Apr 09, 2023 03:48 PM
मविआच्या सभेला भाजपच्या आमदाराचा विरोध, तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील लोकांची काय मागणी?
रामदास कदम दळभद्री माणूस!; कुणी डागलं टीकास्त्र?