नितेश राणे असभ्य आणि वायफळ बोलतात; त्यांची दखल मी काय घ्यावी; ठाकरे गटाच्या नेत्याचं प्रत्यु्त्तर
Mumbai News : भाजपमध्ये निवडणूक घेण्याची हिंमत नाही, कारण जनता बदला घेईल; ठाकरे गटाच्या नेत्याचं टिकास्त्र
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचं ब्रिद वाक्य शतप्रतिशत भाजप हे आहे. जनसेवा हे त्यांच्या ब्रीदवाक्य नाही. त्यामुळे सत्ता कशी येईल यासाठी प्रयत्न करतात. त्यांची निवडणूक घेण्याची हिंमत नाही, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. जर यांनी निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला तर जनता बदला घेईल. बाजार समितीच्या निवडणुकांनी याचा प्रत्यय दिलेला आहे, असं अरविंद सावंत म्हणालेत. नितेश राणे हे असभ्य आणि वायफळ बोलतात, त्यांचे प्रत्येक स्टेटमेंट हे बेदखल आहेत. ज्या नितेश राणेंची कुणीच दाखल घेत नाही. त्यांची दाखल मी का घ्यावी?, असंही अरविंद सावंत म्हणालेत.
Published on: Apr 30, 2023 03:07 PM