महाविकास आघाडीतील एक पक्ष दुसऱ्या पक्षाचा टायर पंचर करतोय; भाजप नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Apr 17, 2023 | 8:24 AM

Ashish Shelar On Uddhav Thackeray : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलंय. तसंच उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय. पाहा व्हीडिओ...

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलंय. “या महाविकास आघाडीमधील तीन पक्ष म्हणजे तीन टायर आणि तीन वेगवेगळी चाकं आहेत. सुरुवातीपासूनच हे एकमेकांना खेचत होते वेगवेगळ्या दिशेला आणि आता एक पक्ष दुसऱ्या पक्षाचा टायर पंचर करत आहे. काँग्रेसचा नेता उभा राहिल्यावर अन्य पक्षातील लोक निघून जात आहेत. आता एकमेकांना पंचर करण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडीचा सुरू आहे”, असं आशिष शेलार म्हणालेत. उद्धव ठाकरे यांचा गोमुत्रावर राग का आहे मला माहित नाही. गाय आणि गोमूत्र हे हिंदूंसाठी पूजनीय आहेत. गाय आणि गोमुत्रावर पुष्टीकरणाचा प्रयत्न करत असतील तर त्यांचं त्यांना लख लाभ.. पण मराठी माणूस आणि हिंदू माणूस गाय आणि गोमूत्रावर असं बोललंल विरसणार नाही. त्यांना दंडित केल्याशिवाय राहणार नाही, असंही शेलार म्हणालेत.

Published on: Apr 17, 2023 08:24 AM
परभणी मनपाचं रस्त्यांकडे दुर्लक्ष, मनस्ताप मात्र नागरिकांना; धुळीनं हैराण
नाशिक जिल्ह्यात तुफान गारपीट, शेत पीकं भुईसपाट अन् शेतकरी झाला हवालदिल