मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार!; फोनवरून धमकी
CM Eknath Shinde Death Threats : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन कॉलवरून ही धमकी देण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन कॉलवरून ही धमकी देण्यात आली आहे. 112 क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे”, एवढंच बोलून हा कॉल कट करण्यात आला आहे. काल (सोमवार) रात्री डायल 112 नंबरवर फोन करून धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजेमधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. या फोनचं लोकेशन चेक केल्यानंतर हे निदर्शनास आलं. हा धमकीचा फोन करणारा धारावीतील शात्रीनगरमध्ये राहणारा असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून पथक तयार करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
Published on: Apr 11, 2023 09:36 AM