आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एका वाक्यात उत्तर

| Updated on: Apr 13, 2023 | 2:37 PM

CM Eknath Shinde on Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या बंडखोरीबाबतच्या दाव्याला एकनाथ शिंदे यांचं एका वाक्यात उत्तर दिलंय. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या बंडाबाबत माजी मंत्री, ठाकरेगटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली.
आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखती दरम्यान केलेल्या गौप्यस्फोटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे बालिश आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

Published on: Apr 13, 2023 02:31 PM
Chandrakant Patil : बाबरी प्रकरण, चंद्रकांत पाटलांविरोधात सोलापुरात अनोखे आंदोलन
सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत म्हणाल्या…