Maharashtra Bhushan Award : डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

| Updated on: Apr 15, 2023 | 2:22 PM

Maharashtra Bhushan Award Ceremony : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार; पाहा व्हीडिओ...

खारघर : डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार खारघरमधील कॉर्पोरेट पार्क या मैदानात होणार आहे. त्यासाठी मोठं व्यासपीठदेखील तयार करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठाला किल्ल्याचं रूप देण्यात आलंय. केंद्रीय मंत्री अमित शहा देखील या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. व्यासपीठाला शेवटचं फिनिशिंग देण्याचं काम देखील मोठ्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी सदस्य येण्यास सुरुवात झालेली आहे. मोठ्या भावनेने सदस्य येत आहेत. तसेच सदस्यांशी बातचीत आणि या कार्यक्रमाच आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी रवी खरात यांनी…

Published on: Apr 15, 2023 01:40 PM
Amit Shah Mumbai Tour : संजय राऊत यांच्या दाव्यावर भाजप मंत्र्याचा पलटवार; म्हणाले, सभा पहायला…
मविआत तारतम्यच नाही, त्यामुळे वज्रमुठीतील एक-एक बोट उघडायला लागलंय; कुणाचा घणाघात?