ठाकरे गटाने मला तीन वेळा मारण्याचा प्रयत्न केला; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप
Kirit Somaiya On Sanjay Raut : किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप; संजय राऊतांवरही निशाणा; पाहा व्हीडिओ...
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. मला भीती वाटते की, संजय राऊत यांनी मला धमकी दिली म्हणून मी विदाऊट कॉलरचा आज शर्ट घातला आहे. सुजित पाटकर प्रकारणात संजय राऊत यांना भीती वाटतं आहेत का? की कोविड मधील घोटाळा हा विषय ची भीती वाटतं आहे? मला या आधी ठाकरे गटाने तीन वेळा मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 2022 मध्ये त्यांनी अनेक आरोप केले होते. जर तुमच्याकडे काही आहे तर ते पुढे आणायला हवे होते ना. हा सगळं विषय वेगळी कडे डायवर्ट करायचा होता त्या साठी या ठिकाणी संजय राऊत वेगवेगळे आरोप करत होते. काही माहिती असेल तर पुढे आणा. सुजित पाटकर प्रकरणातील कॅश ट्रेन बांद्रा किंवा भांडूपपर्यंत जाऊ शकते याची भीती संजय राऊत यांना वाटतं आहे, असंही सोमय्या म्हणाले आहेत.