Rakhi Sawant : लग्न भलत्याचं अन् चर्चा राखी सावंतची!; मुंबईतील लग्नात राखी पोहोचली नवरीच्या रूपात

| Updated on: Apr 28, 2023 | 7:57 AM

Actress Rakhi Sawant Wedding Video : बेगानी शादी में राखी सावंत दीवानी, डिझायनर लेहेंगा, मॅचिंग ज्वेलरी अन् गळ्यात हार; राखी सावंत पोहोचली नववधूच्या रूपात!

मुंबई : मुंबईतील मालाडमधल्या एका लग्नसोहळ्यात ड्रामा क्विन राखी सावंतची जोरदार चर्चा झाली. कारण लग्न होतं एका वेगळ्या जोडीचं अन् नवरीच्या रूपात गेली राखी सावंत! मुंबईतील मालाडमधल्या एका लग्नसोहळ्यात ड्रामा क्वीन राखी सावंत नववधूच्या रुपात आली. मालाडच्या मालवणी इथल्या ग्रीन व्हिलेज हॉटेलमध्ये एका गायिकेच्या लग्नसोहळ्यात राखी पोहोचली. ढोल वाजवून राखीचं स्वागत करण्यात आलं. या लग्नाला राखी सावंत नववधूसारखा मेकअप करून आली होती. लग्नात पोहोचताच राखी सावंत ढोलावर नाचू लागली. राखी सावंतने यावेळी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. “आमची बारात आली नाही, म्हणून मी दुसऱ्याच्या लग्नाला नवरी बनून आली आहे”, असं राखी म्हणाली.

Published on: Apr 28, 2023 07:55 AM
विकृत विचारांची मस्ती जात नाही, अशा शब्दात भाजप नेत्याची मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीका
‘बेस्ट’च्या बसमध्ये आता ‘बोंबाबोंब’ बंद ! काय आहे प्रशासनाचा मोठा निर्णय?