राष्ट्रवादी भाजपची बी टीम आहे का?; मनसे नेत्याने हा सवाल का केला?

| Updated on: Apr 09, 2023 | 10:24 AM

Sandip Deshpande : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीवर घणाघात केलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यावरही संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीवर घणाघात केलाय. राष्ट्रवादी भाजपची भूमिका मांडत असेल तर राष्ट्रवादी भाजपची बी टीम आहे का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करता तुम्ही स्वत: काय आहात? भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट पवारसाहेब वाचून दाखवतात, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. राष्ट्रवादीत एकजूट कधी होती? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग फुटीचा विषय येतो, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. अयोध्याला जायचा सगळ्यांना अधिकार आहे. प्रभू रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे जेव्हा सांगतील तेव्हा आम्हीही अयोध्याला जाऊ, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Published on: Apr 09, 2023 10:24 AM
लोकांची कशी सेवा करावी हे आम्हाला शिकण्याची गरज नाही; पवारांच्या टीकेला केसरकरांच प्रत्युत्तर
शेतकऱ्यांच्या हिताचं काय केलं पाहिजे ते त्यांनी आवश्यक सांगावं; पवारांच्या टिकेवर शिंदेच्या मंत्र्याचा पलटवार