बंडाच्या चर्चांनंतर राष्ट्रवादीचे हे वरिष्ठ नेते अजित पवारांच्या भेटीला; काय कारण?

| Updated on: Apr 19, 2023 | 11:28 AM

Mumbai News : अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या; 'देवगिरी'वर महत्वाची बैठक. पाहा व्हीडिओ...

मुंबई : अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक पार पडतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले. सकाळपासून सुनिल तटकरे ,छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख देवगिरी बंगल्यावर आहेत. यापैकी सुनिल तटकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निघाले आहेत. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील व अनिल देशमुख यांची देवगिरी बंगल्यावर अजित पवारसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. खानदेशातील बडा चेहरा, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल होणार असल्याचीही माहिती आहे.

Published on: Apr 19, 2023 11:28 AM
छोटा राजनला सीबीआयचा दणका; सावंत याचे सिंगापूरमधून प्रत्यारपण
मंत्रालयातीलच इंटरनेट सेवा कालपासून ठप्प, सर्व कामं खोळंबली अन्…