लोकांनी खोके लाथाडलं अन् महाविकास आघाडीला कौल दिला; संजय राऊतांचा शिवसेनेवर निशाणा

| Updated on: Apr 30, 2023 | 11:30 AM

हिम्मत असेल तर महानगरपालिका निवडणुका लढा अन् जिंकून दाखवा!; संजय राऊतांचं चॅलेंज

मुंबई : काल काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर आज काही बाजार समित्यांचा निकाल लागत आहे. तर काही ठिकाणी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेसह महविकास आघाडीस उत्तम यश मिळाले. गद्दार आमदारांचा शेतकरी मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केलं.हेच महाराष्ट्राचे जनमानस आहे. ही सुरुवात आहे.. महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत असाच जोरदार कार्यक्रम होईल.लोकांनी खोके लाथाडले .हे स्पष्ट दिसते.हिम्मत असेल तर महानगर पालिका निवडणुका घेऊन दाखवा! जय महाराष्ट्र!”, असं संजय राऊत म्हणालेत.

Published on: Apr 30, 2023 10:25 AM
मुश्रीफ-घाटगे संघर्ष; कारण फक्त एकच बाजार समिती! काय होणार याची कागलकरांना धाकधूक
मुंबईतून पुण्याकडे प्रवास करणार असाल तर बातमी आवश्य वाचा; अन्यथा ट्रॅफिकमध्ये फसाल