बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका; संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut on CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका यावरून त्यांनी घणाघात केला आहे. ट्विट करत राऊतांनी ही टीका केली आहे. “आता प्रश्न हाच आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुंत्वाच्या विचाराचे आम्हीच पाईक आहोत असे बोलणारे सरकार जमा ४0 मिंधे काय करणार? काल याच बाळासाहेब विरोधकांच्या चड्डीची नाडी पकडून अयोध्येत जाऊन आले. साहेबांच्या अपमाना विरोधात कोण दांडका उचलणार? नालायक लेकाचे!गुलाम!”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
Published on: Apr 11, 2023 10:51 AM