देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागा; संजय राऊत यांची मागणी

| Updated on: Apr 19, 2023 | 11:02 AM

Sanjay Raut on CM Eknath Shinde : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारचीच आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लाखो श्री सेवक आले होते. पण यात उष्माघातामुळे श्री सेवकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागायला हवा”; अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 निरपराध लोकांचा मृत्यू झाला. आता जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर नवी मुंबईत जाऊन पोलिसांसमोर त्यांनी धुडगूस घातला असता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा, असं राऊत म्हणाले आहेत.

Published on: Apr 19, 2023 10:53 AM
ठाणे आगीवरून प्रशासनासनावर जितेंद्र आव्हाड आक्रमक; म्हणाले हे अपयश…
‘श्रीसदस्य मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्या’, कुणाची आक्रमक मागणी