सभेत घुसा आणि परत जाऊन दाखवा; संजय राऊत यांचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

| Updated on: Apr 20, 2023 | 10:42 AM

Sanjay Raut on Gulabrao Patil : राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या आव्हानाला खासदार संजय राऊतांचं उत्तर. म्हणाले...

मुंबई : राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेगटाचे खासदार संजय राऊतांना इशारा दिला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत माजी जळगावात येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. पण सभेत सभेत त्यांनी चौकटीत बोलावं. संजय राऊत सारखा माणूस माझ्यावर बोलत असेल तर मी सभेत घुसेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटलांच्या या आव्हानाला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटलांना म्हणावं या सभेत घुसा आणि परत जाऊन दाखवा, असं संजय राऊत म्हणाले आहेत. अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडी मजबूत राहावी ही आम्ही इच्छा आहे, अजित पवार कुठेही जाणार नाहीत, असंही राऊत म्हणाले आहेत.

Published on: Apr 20, 2023 10:29 AM
ठाण्यातील बिझनेस पार्कमधील आगीची होणार चौकशी
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा सरकार लपवतंय; संजय राऊत आक्रमक