संजय राऊत यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांची मुंबई पोलीस चौकशी करणार, नेमकं प्रकरण काय? पाहा व्हिडीओ…
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन केला जातो. कैद्यांशी डिलिंग केली जाते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अंडरवर्ल्डची टोळी चालवली जाते,", असा गंभीर आरोप केला होता. संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन केला जातो. कैद्यांशी डिलिंग केली जाते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अंडरवर्ल्डची टोळी चालवली जाते,”, असा गंभीर आरोप केला होता. संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर आता पोलिसांकडून या आरोपांची पडताळणी केली जाणार आहे. पोलिसांकडून संजय राऊत यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांना पोलिसांनी आजच नोटीस पाठवली आहे.
Published on: Jul 16, 2023 07:20 AM