Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका, अधिवेशनासाठी येणार आमदार ट्रेनमध्ये अडकले

| Updated on: Jul 08, 2024 | 10:49 AM

मुंबईत रविवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वेरुळांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली असून अनेक एक्स्प्रेसही अडकल्या आहेत. दरम्यान अधिवेशनासाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांनाही पावसाचा फटका बसला आहे

Follow us on

मुंबईत रविवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वेरुळांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली असून अनेक एक्स्प्रेसही अडकल्या आहेत. दरम्यान अधिवेशनासाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांनाही पावसाचा फटका बसला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील 10 ते 12 आमदार एक्स्प्रेसमध्ये अडकले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरी यांचाही त्या आमदारांमध्ये समावेश आहे. आ. संजय गायकवाड , आ. अमोल मिटकरी, आ. जोगेंद्र कवाडे, अनिल पाटील आणि इतर सात आमदार हावडा मेलमध्ये अडकले आहेत. अनेक जण ट्रेनमधून खाली उतरून रुळांवरून चालत निघाले. तसेच सोलापूर वरून मुंबईला येणारी सिध्देश्वर एक्सप्रेस गाडी कुर्ला येथे अडकली आहे. सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि औसा मतदारसंघ आमदार अभिमन्यू पवार हे देखील ट्रेनमध्ये अडकले आहेत. पावसाचा फटका बसल्यानंतर ट्रेन अडकल्याने प्रवाशांनी एक्स्प्रेस सोडून पायी चालणं पसंत केलं आहे. अनेक आमदारांनीही हाच मार्ग निवडल्याचं दिसून आलं.