संजय राऊत यांना हक्कभंग कारवाईला सामोरं जावंच लागेल; कुणाचा इशारा

| Updated on: Mar 15, 2023 | 1:10 PM

Sanjay Raut : आज सकाळी बोलताना संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे व्हायरल व्हीडिओ प्रकरणावर टिपण्णी केली आहे. त्याला शिवसेनेच्या नेत्यांने उत्तर दिलं आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत यांना काही कामधंदा राहिलेला नाही. ते उठसूट टीका करायची कामं करत आहेत. महिलांशी संबंधित संवेदनशील विषयातही ते गंभीर नाहीत. काहीही भाष्य करतात. हक्क भंग कारवाईला संजय राऊत त्यांना सामोरं जावंच लागेल”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. दरम्यान, आज सकाळी बोलताना संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे व्हायरल व्हीडिओ प्रकरणावर टिपण्णी केली आहे. त्याला संजय गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे.