भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश; वडील सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Mar 14, 2023 | 9:21 AM

Subhash Desai on Bhushan Desai Shivsena Pravesh : शिवसेना ठाकरेगटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पूत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर सुभाष देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पूत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या बाळासाहेब भवनमध्ये हा पक्षप्रवेश झाला. त्यावर सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे”, असं सुभाष देसाई म्हणालेत.

नामांतराच्या समर्थनार्थ मनसेही रस्त्यावर; जलील यांना देणार उत्तर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 30000 कर्मचाऱ्यांनी पुकारला संप, रुग्णांचे हाल