मुंबईकरांनो, काळजी घ्या… एप्रिल महिन्यात उन्हाळा अधिक तीव्र होणार
Mumbai Temperature : पुढील काही दिवसांत मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आजपासून राज्यात कोरडे हवामान असेल. कमाल तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होईल. त्यामुळे ऊन्हाचे चटके अधिक जाणवू लागतील, त्यामुळे काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांत पारा 38 अंशांवर गेला आहे. पुढील काही दिवसांत यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने त्रास दिला असला तरी एप्रिल महिन्यात मात्र ऊन्हाचे चटके अधिक जाणवतील. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
Published on: Apr 03, 2023 11:29 AM