Mumbai : दोन तरुण माहिम कॉजवेमधील मिठी नदीत बुडाले, एकाचा मृत्यू

| Updated on: Aug 12, 2022 | 9:58 AM

महाराष्ट्रात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील नद्यांना पूर आलाय. आत्तापर्यंत पूरातून वाहून अनेकजण गेले आहेत. पुराच्या पाण्यात कोणीही उतरू नका असं सरकारकडून आवाहन करण्यात आलंय. 

मुंबई : गुरुवारी मध्यरात्री घरी जात असताना लघुशंकेसाठी दोन मित्र माहीम खाडीवर उभे होते. याचवेळी एकाचा पाय सरकल्यानं तो मुलगा खाली पडला. मित्र खाली पडल्याचं पाहताच त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा गेला असता दोघेही पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  कुर्ला (Kurla) येथील दोन तरुण माहिम (Mahim) कॉजवे येथील मिठी नदीत (Mithi River) बुडाल्याची ही घटना आहे. हे तरुण माहिम दर्ग्यात दर्शनासाठी कुर्लाहुन गेले होते. दरम्यान, याप्रकरणी एक माहिती समोर आली असून एकाची बॉडी किनाऱ्यावर सापडली आहे. तर दुसऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. महाराष्ट्रात मागच्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे राज्यातील नद्यांना पूर आला आहे. आत्तापर्यंत पूरातून वाहून अनेकजण गेले आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्यात कोणीही उतरू नका असं सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

Published on: Aug 12, 2022 09:57 AM
Girish Mahajan : पंकजा मुंडेंना मोठं पद मिळेल, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
Guardian Minister List Maharashtra: ध्वजारोहणाची यादी,म्हणजे हेच पालकमंत्री?