मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून महिनाभर पाणीकपात लागू
Mumbai Water cut : संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. महिनाभर संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : पुढचा महिनाभर मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कारण संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. पुढचा महिनाभर संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाण्याच्या कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे शहरात होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्यात 31 मार्चपासून अंदाजे 30 दिवस 15 टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
Published on: Mar 29, 2023 10:14 AM