ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण

| Updated on: Dec 02, 2024 | 11:53 AM

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने जाताना वाहन खराब झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती समोर आली. मात्र यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवरे सोमवार सकाळपासून ट्राफिक जाम झाल्याने मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. वडाळ्यापासून ते थेट मानखुर्दपर्यंत हे ट्राफिक खोंळबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने जाताना वाहन खराब झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती समोर आली. मात्र यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर सुटावी यासाठी पोलिसही अविरत कार्यरत होते. वाहतूक नियमित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, हळूहळू ही वाहनं पुढे सोडली जात होती. सकाळच्या वेळेस कामाला निघालेल्या मुंबईकरांना या वाहतूक कोंडीमुळे बराच फटका बसला, अनेकांना कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी झालेल्या जाममुळे मुंबईकर हैराण झाले होते.

 

Published on: Dec 02, 2024 11:53 AM
एका गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ? संजय राऊत खवळले
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?