“जे आहे ते सत्य बोला, मुंब्र्याला बदनाम करू नका” ; हिंदू-मुस्लिम नागरिकांचा मूक मोर्चा

| Updated on: Jun 12, 2023 | 8:35 AM

गाझियाबाद पोलिसांनी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतराबाबत एक मोठा केल्या गौप्यस्फोट केल्यानंतर मुंब्र्यातील हिंदू-मुस्लिम नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. धर्मांतराच्या कथित आरोपामुळे मुंब्र्याचे नाव बदनाम करणाऱ्यांच्या निषेधार्थ या नागरिकांनी मूक मोर्चा काढला.

ठाणे : गाझियाबाद पोलिसांनी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतराबाबत एक मोठा केल्या गौप्यस्फोट केल्यानंतर मुंब्र्यातील हिंदू-मुस्लिम नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. धर्मांतराच्या कथित आरोपामुळे मुंब्र्याचे नाव बदनाम करणाऱ्यांच्या निषेधार्थ या नागरिकांनी मूक मोर्चा काढला. “जे आहे ते सत्य बोला, मुंब्र्याला बदनाम करू नका” अशा आशयाचे बॅनर घेऊन नागरिकानी मूक मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद पोलिसांनी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून मुस्लिम मुलं हे हिंदू मुलांना धर्मांतर करत असून 400 हिंदू मुलांना मुंब्रातून धर्मांतर केल्याचा मोठा गौप्यस्फोट गाजियाबाद पोलिसांनी केला होता. यामध्ये एका आरोपीला अटक असून दुसरा फरार आहे, त्याचा देखील गाजियाबाद पोलीस तपास करत आहे.

Published on: Jun 12, 2023 08:35 AM
VIDEO | ‘गुन्हेगार, दंगेखोर, बलात्कारी यांच्यावर कारवाई करताना फडणवीसांच्या हाताला लकवा मारतो का?!’ काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
Special Report | मनसेचं इंजिन पुन्हा मराठी ट्रॅकवर? राज ठाकरे पुन्हा परप्रांतिय मुद्दा छेडणार?