हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडावर; आज पुन्हा चौकशी
मुश्रीफांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. तर मुश्रीफ यांना दोन आठवडे अटक करू नये, असे आदेशच कोर्टाने दिले होते
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ सध्या ईडीच्या रडारवर आहेत. गेल्या दोन महिन्यातील तिसरी कारवाई करत ईडीच्या पथकाने मुश्रीफ यांच्या घरी तपासणी केली. त्यानंतर मुश्रीफांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. तर मुश्रीफ यांना दोन आठवडे अटक करू नये, असे आदेशच कोर्टाने दिले होते. त्यानंतर आज विधानभवनातील कामकाज संपल्यानंतर चौकशीला समोर जाणार अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब पाटील साखर कारखाना, ब्रिक्स कंपनी प्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
Published on: Mar 15, 2023 09:55 AM