खासदारकिच्या चर्चा सुरू असतानाच हसन मुश्रीफ यांचे विधानसभेवर सुचक वक्तव्य

| Updated on: Jun 03, 2023 | 8:29 AM

कोल्हापुरमधून हसन मुश्रीफ यांना संधी दिली जाणार होती. तर त्यांनी यात पढाकार घेऊन लोकसभा लढवावी अशी गळ वरिष्ठांनी मुश्रीफ यांना घातली होती. मात्र यावेळी मुश्रीफ यांनी मात्र आपला लोकसभेला नकार दाखवला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने मिशन लोकसभा मोहिमेला सुरुवात केली आहे. गेली दोन दिवसापासून मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारसंघनिहाय आढावांचा सपाटा लावला आहे. याच बौठकित शिरूर मतदारसंघावरून नकार नाट्य समोर आल्यानंतर असाच किस्सा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत समोर आला आहे. कोल्हापुरमधून हसन मुश्रीफ यांना संधी दिली जाणार होती. तर त्यांनी यात पढाकार घेऊन लोकसभा लढवावी अशी गळ वरिष्ठांनी मुश्रीफ यांना घातली होती. मात्र यावेळी मुश्रीफ यांनी मात्र आपला लोकसभेला नकार दाखवला आहे. तर विधानसभा लढविण्यास आपली पसंती असल्याचे सांगत आणखी एक विधानसभा लढविण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार हे पक्क झालं आहे. मात्र त्यांच्या नकारामुळे लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न स्थानिक नेत्यांसह वरिष्ठांनासह पडला आहे.

Published on: Jun 03, 2023 08:28 AM
तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे ग्रहन काही सुटेना! आता पुन्हा बदली? दिला कोणता विभाग पहा?
SSC Exam Result : शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत, जिद्दीनं पूर्ण केलं वयाच्या ६० व्या वर्षी दहावीचं शिक्षण