Sambhajinagar News : संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
Ram Navmi In Sambhajinagar : राम नवमीचा उत्सव संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतानाच याच संवेदनशील भागात मुस्लिम बांधवांकडून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवण्यात आलेला दिसून आला आहे.
आज संपूर्ण देशात राम नवमीचा उत्सव सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या किराडपुरा इथल्या राम मंदिरात देखील राम नवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. अत्यंत संवेदनशील म्हणून हा भाग ओळखला जातो. याच ठिकाणी 2 वर्षांपूर्वी मोठा राडा झाला होता. त्यानंतर आज याच ठिकाणी मुस्लिम समाजाकडून वेगळा आदर्श ठेवण्यात आलेला बघायला मिळत आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे शहरात उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांग लावलेली आहे. या भाविकांसाठी ज्यूस तसंच आंब्याच्या रसाचं वाटप मुस्लिम बांधवांकडून केलं जात आहे. या उपक्रमाचं सगळ्यांकडून कौतुक केलं जात आहे.
Published on: Apr 06, 2025 04:01 PM