ऐक्याचं दर्शन! मुस्लिम बांधवांकडून विठुरायाच्या पालखी सोहळ्यात फुलांचा वर्षाव
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील वरुड काझी या गावात वारी निघाली आहे. या वारीमध्ये हिंदू-मुस्लिम एकताचं प्रतिक पाहायला मिळालं आहे. वरुड काझी या गावात निघालेल्या दिंडी सोहळ्यात मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं आहे.
औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील वरुड काझी या गावात वारी निघाली आहे. या वारीमध्ये हिंदू-मुस्लिम एकताचं प्रतिक पाहायला मिळालं आहे. वरुड काझी या गावात निघालेल्या दिंडी सोहळ्यात मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं आहे. आज आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र आल्याने मुस्लिम समाजाच्यावतीने उद्या बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज निघालेल्या दिंडी सोहळ्यात मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात आलं आहे. थेट मशिदीसमोरच वारकऱ्यांची दिडी आल्यावर मुस्लिम बांधवांकडून फुल उधळवण्यात आली आहे.
Published on: Jun 29, 2023 12:57 PM