…तर अल्पसंख्यांक देशाच्या विकासामध्ये भरीव योगदान देतील – शरद पवार
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक योगदान मुस्लिमांचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
नागपूर : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सर्वाधिक योगदान मुस्लिमांचं (Muslims) आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. ते नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक योगदान हे मुस्लिम बांधवांचं आहे. मुस्लिमांमध्ये गुणवत्ता आहे, त्यांना संधी मिळणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, अल्पसंख्यांकांकडे गुणवत्ता आहे. त्यांना जर समान संधी मिळाली तर मला खात्री आहे, अल्पसंख्यांक समाज आणि त्यांच्या पुढील पिढ्या देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Published on: Oct 09, 2022 09:42 AM