मंत्रिपदासाठी फेक ऑफर; विरोधक म्हणतात, भाजपकडे प्रचंड पैसा, वसुलीसाठी एजंट ठेवले!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं खोटं सांगून, भाजपच्या आमदारांची फसवणुक केल्याची धक्कादायक घटना घडली. हे प्रकरण समोर येताच राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला.
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं खोटं सांगून, भाजपच्या आमदारांची फसवणुक केल्याची धक्कादायक घटना घडली. हे प्रकरण समोर येताच राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.’महाराष्ट्रात खंडणीखोर सरकार, पैसे जमवण्यासाठी एजंट नेमलेत’. तर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी ‘महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडे प्रचंड पैसा असल्याने हा ट्रॅप रचला असेल’, असा टोला लगावला आहे.
Published on: May 18, 2023 01:20 PM