अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन

| Updated on: Jul 19, 2023 | 12:27 PM

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारला धारेवर धरलं. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.

मुंबई, 19 जुलै 2023 | पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारला धारेवर धरलं. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते. लंपट सोमय्या, भाजपचा धिक्कार असो, 5000 महिला गेल्या कुठे? अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘महिला विरोधी कलंकित घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो’ अशा आशयाचे बॅनर्स विरोधकांच्या हातात दिसले.

Published on: Jul 19, 2023 12:27 PM
‘हे शासन आहे की दुष्याशन?’ शिवसेना नेत्याचा महिला सुरक्षिततेवरून सरकारवर घणाघात
‘एनडीएतील पक्षांनी त्यांचा सत्कारच केला पाहिजे’; राऊत यांची मोदी, शाह आणि नड्डावर खरपूस टीका