हा महाराष्ट्रासह जनतेचा अपमान, शाहु महाराज यांची जोरदार टिका
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील कारभाराचा निषेध करण्यासाठी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने जोडे मारो आंदोलन पुकारले आहे.
मुंबईतील हुतात्मा चौकात महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन होत आहे. या आंदोलनात शिवरायाचे वंशज कोल्हापूरचे खासदार शाहु महाराज यांनी देखील महायुतीच्या कारभारावर जोरदार प्रहार केला आहे. शाहु महाराज यावेळी म्हणाले की मालवणमध्ये काय झालं हे आपण पाहिले आहे. भारताच्या बाहेरही लोक संतप्त झाले आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांनी हे केलं त्यांना कोणीही मोकळं सोडायला नको.. महाराष्ट्रात याविरोधात संताप व्यक्त होत आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राचा मान ठेवला पाहिजे. शिवाजी महाराजांचा मान आपण राखला पाहिजे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हा पुतळा ज्याने बसवला, त्यांचा निषेध केला पाहिजे असेही शाहु महाराज यांनी यावेळी सरकारला खडे बोल सुनावले.
Published on: Sep 01, 2024 01:35 PM