शरद पवार कार्यक्रमात; पण कार्यकर्ते पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार, नेमकी भूमिका काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारादरम्यान मविआने मोदींना काळे झेंडे दाखवणार असल्याचा निर्धार केला आहे.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. असे असले तरी राष्ट्रवादी शरद पवार गटासह काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी मोदींना काळे झेंडे दाखवणार असल्याचा निर्धार केला आहे. मोदींच्या दौऱ्यात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांना नजरकैदीत ठेवण्याचे नियोजन केले आहे. यावर प्रतिक्रिया देत्याना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं की, “पुरस्काराचा कार्यक्रम नियोजित असल्यामुळे शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणारच. मात्र मणिपूर प्रकरणावरून मविआ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवणार आहेत.आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करणार.आमच्या आंदोलनाला शरद पवारांनी विरोध केलेला नाही.”